शिवराज्याभिषेक दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज शुक्रवार दि. ६ जून २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिना निमित्त शहरातील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी उद्यानातील महाराजांच्या अर्ध पुतळ्यास याच बरोबर कॉ. के.एल. मलाबादे चौकामधील राज्याभिषेक सोहळा डिजिटल फलकास आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि आमदार डॉ.राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणेत आले.
Advt
याप्रसंगी महानगरपालिका कर्मचारी श्रीहर्ष माळगे यांची कन्या आराध्या माळगे हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित केलेल्या भाषणास उपस्थित मान्यवरांनी उस्फुर्त प्रतिसाद देवुन तिचे कौतुक केले.
याप्रसंगी उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त राहुल मर्ढेकर, शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव, माजी सभापती राजु बोंद्रे, सहा. आयुक्त विजय राजापुरे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा.आयुक्त रोशनी गोडे, आरोग्य अधिकारी डॉ.सुनीलदत संगेवार, सतिश मुळीक, भारत बोंगाडे क्रीडा अधिकारी संजय शेटे, शितल पाटील , गणेश शिंदे, सुजाता दाभोळे, सहा.क्रीडा अधिकारी संजय कांबळे, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, महेश बुचडे, आनंदा मकोटे आदींसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना आ.राहुल आवाडे,आयुक्त पल्लवी पाटील व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









