कामगार संघटनांतर्फे आ.राहुल आवाडे यांचा भव्य सत्कार संपन्न.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील रस्ते,पर्यावरण, ड्रेनेज इत्यादी विकास कामासाठी ७०० कोटी तसेच महानगरपालिकेची थकीत GST परतावा रू.१०७७ पैकी ६५७ कोटी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाचे बैठकीत मंजूर करून घेतले बद्दल नगरीचे लोकप्रिय आमदार डॉ.राहुल आवाडे यांचा सत्कार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वतीने कौन्सिल हॉल मध्ये आयोजित करणेत आला होता
अध्यक्ष स्थानी महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती पल्लवी पाटील होत्या. स्वागत व प्रास्ताविक म्युनिसिपल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष के.के.कांबळे यांनी केले.त्यानंतर अभिनंदन पर व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या वर युनियनचे प्रमुख व पदाधिकारी प्रा. ए बी पाटील,शामगोंड पाटील,नौशाद जावळे,संजय शेटे,कृष्णा गोंदुकुपे,धनंजय पळसुले यांची भाषणे झाली.
Advt
त्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती पल्लवी पाटील मॅडम यांचे हस्ते आमदार डॉ.राहुल आवाडे यांचा शाल,श्रीफळ व फोटो भेट देवून सत्कार करणेत आला. सत्काराला उत्तर देताना,गेल्या सहा महिन्यात शहरासाठी केलेल्या विविध विकास कामांचा उल्लेख केला त्यासाठी निधी मंजूर करून घेताना आलेल्या अडचणीवर मार्ग काढून निधी प्राप्त करून घेतले याचा पाढाच सांगितला.जीएसटी महापालिकेचा मुख्य आर्थिक कणा असेलमुळे त्यासाठी विशेष प्रयत्न केलेचे सांगितले त्यासाठी आयुक्त यांनीही पाठपुरावा व सहकार्य केले बद्दल आवर्जून उल्लेख केला, अध्यक्षीय भाषणात श्रीमती पाटील यांनी आमदार डॉ राहुल आवाडे यांनी तत्परतेने पाठपुरावा करून विकास निधी ७०० कोटी त्याच बरोबर थकीत रू.१०७७ कोटी जीएसटी परतावा पैकी ६५७ कोटी रु मंजूर घेत लेबद्दल विशेष आभार मानले .सत्कार समारंभास सर्व युनियनचे पदाधिकारी व सदस्य सर्वश्री संपत तांबिरे , संजय कांबळे,सचिन घोरपडे,दशरथ जावळे,संजय पाटील,अल्लाउद्दीन जमादार,आकाश माने,युवराज भोसले, संतोष पसोबा,संतोष कांबळे, राजू जमादार, राहूल पांढरपट्टे,श्रीकांत पाटील, त्या बरोबर अधिकारी डॉ संगेवर,सहायक आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखापरीक्षक श्रीमती खोत,मुख्य लेखा अधिकारी खोळपे,सॅनिटरी इन्स्पेक्टर करन लाखे, हर्ष मiळगे,इत्यादी कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने हजर होते.
शेवटी आभार राज्य समन्वय समितीचे सदस्य हरी माळी यांनी आभार मानले,सूत्र संचालन म्युनिसिपल वर्कर्स युनियनचे खजिनदार श्री सचिन खोंद्रे यांनी केले.
आ.राहुल आवाडे यांचा सत्कार करताना कामगार संघटनांचे पदाधिकारी,आयुक्त पल्लवी पाटील व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








