इचलकरंजीत ४.५५ लाखाची घरफोडी,रोख रक्कम व दागिने चोरीला
इचलकरंजी:
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजराजेश्वरी नगर, ओम चौक येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ४,५५,००० किमतीचे रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ५ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते ६ जून सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान घडली.
Advt
फिर्यादी शामराव गणपती घरसे (वय ६२) हे आपल्या कुटुंबासह राहत असलेल्या घरातील जिन्याच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश मिळवला. त्यानंतर खोलीतील कपाट फोडून १,२५,०००/- रोख, तसेच सोन्याचे दिड तोळ्याचे गंठण, अर्ध्या तोळ्याचे टॉप्स, अंगठी, नथ व १५ सोन्याचे मणी असा ऐवज लंपास करण्यात आला.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा तपास पोसई जाधव करत असून, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







