ICHMH51NEWS.IN
9921600800

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात इसम जखमी – नागरिकांमध्ये संतापाची लाट

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात इसम जखमी – नागरिकांमध्ये संतापाची लाट

इचलकरंजी
शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा त्रास वाढत चालला असून, आज सकाळी पुन्हा एका इसमावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली. पवन मंत्री (वय ४५, रा. कोणार्क अपार्टमेंट, जुना चंदूर रोड) हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना मोकाट कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करून हात व पायावर चावा घेतला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला इतका तीव्र होता की त्यांचे कपडे ही फाटले.
याआधी देखील शहरात भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविरुद्ध नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिकेने कुत्रे पकडण्याची व लसीकरण मोहिम राबविली होती. काही दिवस चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, ती परत सुरू झाल्याने नागरिकांत नाराजी आहे.
Advt
आज पुन्हा झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण आहे. महापालिका प्रशासन या समस्येवर कोणती ठोस उपाययोजना करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी पवन मंत्री
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा