लहान गटात रुपचंद बंडगर यांचा बैल प्रथम
इचलकरंजी:
कर्नाटक बेंदूरच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाच्यावतीने डिकेटीइ नारायण मळाच्या पटांगणावर घेण्यात आलेल्या लहान गटातील बैल पळविणे (लाकुड ओेढणे) शर्यतीत रुपचंद बंडगर यांच्या बैलाने २८.७ सेंकदात निर्धारीत अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला. या शर्यतीमध्ये एकूण ३१ बैल सहभागी झाली होती.
प्रगतशील शेतकरी संजय पाटील यांच्या हस्ते या शर्यतीचा मैदान पूजनाने प्रारंभ झाला. यावेळी सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, उत्तम आवाडे, प्रकाश दत्तवाडे, बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, राहुल गाट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शर्यतीत २८.७ सेंकदात निर्धारीत अंतर पार करत रुपचंद बंडगर यांच्या बैलाने प्रथम क्रमांक, तुषार आरबोळे यांच्या बैलाने २९.२ सेंकदासह द्वितीय आणि महादेव पाटील यांच्या बैलाने २९.४ सेंकदासह तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी खजिनदार अहमद मुजावर, आदित्य आवाडे, संपत जामदार, शिवाजी माळी, शांताप्पा मगदूम सागर मगदूम, पापालाल मुजावर, गजानन अब्दागिरे, सदाशिव कित्तुरे, शिवाजी माळी, राजू दरिबे, राजेंद्र बचाटे, बजरंग कुंभार, सागर गळतगे यांच्यासह शौकीन उपस्थित होते.
Advt
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








