प्रार्थना स्थळी घुसून धर्मीय भावना दुखावल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
इचलकरंजी –
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रार्थनास्थळी जबरदस्तीने घुसून धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बिशप संजय शामसुंदर आढाव (वय ५४, रा. हिरा जीम मागे, शाहूपुतळा जवळ, इचलकरंजी) यांच्या फिर्यादीवरून शिवप्रसाद व्यास व इतर ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advt
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी व साक्षीदारांना “मागासवर्गीय व गोरगरीब लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर करता” अशी धमकी दिली. तसेच “तुम्ही इतर देव-देवतांचे फोटो प्रार्थना हॉलमध्ये लावा” असे म्हणत धार्मिक भावना दुखावणारी विधाने केली.
या जमावाने प्रार्थना हॉलच्या कंपाऊंडमध्ये जबरदस्तीने प्रवेश करत, फिर्यादीसह साक्षीदार यांना मारण्यासाठी धाव घेत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यामुळे भक्ती करत असलेल्या नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







