ICHMH51NEWS.IN
9921600800

प्रेमसंबंधाच्या संशयातून फळविक्रेत्यावर प्राणघातक हल्ला,संशयितास २ दिवसाची कोठडी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रेमसंबंधाच्या संशयातून फळविक्रेत्यावर प्राणघातक हल्ला,संशयितास २ दिवसाची कोठडी

इचलकरंजी

कबनूर येथील एच.पी. पेट्रोलपंपासमोर प्रेमसंबंधाच्या संशयातून फळविक्रेता संजय बाबू बागेवाडी (वय ५१, रा. तांबे माळ, इचलकरंजी) यांच्यावर गजानन शिवलिंग मनवे (रा. खाणभाग, सांगली) याने प्राणघातक हल्ला केला.
रविवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास फिर्यादी दुचाकीवरून जात असताना आरोपीने आपली चारचाकी (MH 10 CA 6029) आडवी लावून रस्ता अडवला व महिलेच्या संपर्क करण्यावरून वाद घालत तिच्याशी संपर्क ठेवू नको म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने पांढऱ्या रंगाच्या कटरने फिर्यादीच्या डोक्यावर, गालावर व हातावर वार करत गंभीर जखमी केले.

Advt

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक साने करीत आहेत. जखमीवर उपचार सुरू आहेत.तर आरोपीला २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा