स्वप्निल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोसेवा केंद्रास १ हजार पेंडी गवत व चाणक्य अंत्यसंस्कार केंद्रास १५ हजार शेणी दान
इचलकरंजी –
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीनारायण गोसेवा याठिकाणी एक हजार पेंडी गवत तसेच पंचगंगा स्मशानभूमीत चाणक्य अंत्यसंस्कार केंद्रास १५ हजार शेणी देण्यात आल्या.
Advt
विविध सामाजिक उपक्रमांनी स्वप्निल आवाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधत लक्ष्मीनारायण गोसेवा येथे १ हजार गवत पेंढ्या तसेच पंचगंगा स्मशानभूमी येथील चाणक्य अंत्यसंस्कार सेवा या संस्थेस १५ हजार शेणी दान देण्यात आल्या. याप्रसंगी सहकार भारती महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख वैशाली आवाडे, क. आ. इचलकरंजी जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, जनरल मॅनेजर दीपक पाटील, किरण पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, नवमहाराष्ट्र सूत गिरणीचे व्हाईस चेअरमन नानासो पाटील, शेखर शहा यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी माजी शिक्षण सभापती राजू बोंद्रे, माजी पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, नितेश पवार, इम्रान मकानदार, सतिश मुळीक आदींनी परिश्रम घेतले.
Advt
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








