ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका प्रत्येक विद्यार्थ्यांस देणार ८,००० रुपयाचे शैक्षणिक साहित्य, पटसंख्या वाढवण्यासाठी घरफाळ्यात १०% सवलतीचा प्रस्ताव.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका प्रत्येक विद्यार्थ्यांस देणार ८,००० रुपयाचे शैक्षणिक साहित्य, पटसंख्या वाढवण्यासाठी घरफाळ्यात १०% सवलतीचा प्रस्ताव.

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा खाजगी शाळांच्या पातळीवर नेण्याचा निर्धार मनपा प्रशासनाने केला आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी महानगरपालिकेच्या शाळांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.
१६ जुन रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ८,००० रुपयाचे शैक्षणिक साहित्य २ गणवेशासह दिले जाणार आहे,तसेच आपल्या पाल्याचा मनपा शाळेत प्रवेश घेणाऱ्यांना संयुक्त करात १०% सवलतीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
१६ जून रोजी शाळा सुरू होत असून, पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे मनपाच्या वतीने अनुदानित सर्वच शाळात गुलाबपुष्प देऊन आनंदात स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण प्रशासकीय आणि शैक्षणिक कर्मचारी वर्ग शाळांमध्ये हजर राहणार आहे. नववर्षाच्या प्रारंभाला विद्यार्थ्यांना सकारात्मक अनुभव मिळावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
Advt
सध्या इचलकरंजी शहरात एकूण १०० मनपा शाळा असून, त्यापैकी ३४ शाळा मनपाच्या आहेत. प्राथमिक शाळांमध्ये ७२३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर शाहू हायस्कूलमध्ये सुमारे ८०० विद्यार्थी आहेत. या शाळांमधील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी डागडुजीचा आराखडा तयार करण्यात आला असून,लवकरच त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
Advt
यावर्षी इयत्ता १ ली ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मनपाच्या वतीने दोन गणवेश मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक निधी शाळा समितीच्या खात्यावर जमा करण्यात आलेला असून, प्रत्येक शाळेला गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, गणवेश, वह्या,पाठ्यपुस्तके यांसह इतर एकूण १९ प्रकारचे शालेय साहित्यही विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार आहे. त्यामुळे शिक्षणाचा आर्थिक भार पालकांवर न पडता विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.
महानगरपालिकेचा उद्देश स्पष्ट आहे – दर्जेदार शिक्षण, उत्तम सुविधा आणि आर्थिक मदत यांचा समतोल साधून शाळांना आणि विद्यार्थ्यांना सक्षम करणे. या निर्णयामुळे मनपाच्या शाळांवरील विश्वास वाढेल आणि अधिकाधिक पालक आपल्या पाल्यांसाठी या शाळांची निवड करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी प्रास्ताविक व स्वागत राजेंद्र घोडके सरांनी केले तर पत्रकारांच्या प्रश्नास शिक्षण विभाग प्रमुख इरफान पटेल यांनी उत्तरे दिली.यावर्षी पहिल्याच दिवशी सर्व साहित्य देण्यासाठी आयुक्तांनी मोठया प्रमाणावर प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.

आयुक्तांचे भावनिक आवाहन,

प्रिय, या वर्षीच्या शालेय जीवनाची सुरुवात एका खास आनंद वार्तेसह करतोय।
आम्ही तुमच्या पावलांची, गोंगाटाची, हमण्याची वाट बघत थांबलोय । तुमच्या अनुपस्थितीत आम्ही फारच एकटे पडलो आहोत आपले वर्ग रिकामे आहेत, मैदान शांत आहे, आणि फळा तर तुमच्या अक्षरांची ओळख विसरत चालला आहे….
पण आता… सोमवार, १६ जूनपासून तुम्ही परत येत आहात ! आणि यंदा, या पुनर्भेटीला खास बनवण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन येत आहे!
तुम्ही शाळेत पहिल्याच दिवशी पाऊल टाकाल, आणि तुमच्या हातात असेल तुमचा पूर्ण नवीन पाठ्यपुस्तक संच, स्वच्छ वह्या, आकर्षक म्कूल बैंग, रंगीबेरंगी कलर बॉक्स, कंपास बॉक्स आणि बरच कांही…! [ बमण्यासाठी नवे सुबक आणि आरामदायक बेंचेस खास तुमच्यासाठी लाबले गेले आहेत ! * तुमचा नवीन, टापटीप शालेय गणवेश (युनिफॉर्म) सुद्धा पहिल्याच दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे!
शिकण्यासाठी, खेळण्यामाठी, हसण्यासाठी, आणि स्वप्रांना पंच देण्यासाठी प्रत्येक गोष्ट अगदी सज्ज आहे.
या नवीन वाटचालीसाठीआमचं प्रत्येक दार उघडं आहे…. आपल्या वर्गखोल्या उजळून टाकण्यासाठी, ज्ञानाच्या गंधाने न्हानेलं वातावरण पुन्हा सजवण्यासाठी, या ना लवकर मोमवार, १६ जूनपासून !
तुमची आतुरतेने वाट पाहणारी, आपली महानगरपालिकेची शाळा-
पल्लवी पाटील-आयुक्त व प्रशासक
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा