बेंदूर मिरवणुकीत अश्लील हावभाव; १५ जणांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी
शहरातील झेडा चौकात शंभु बैल मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व नृत्य केल्याप्रकरणी १५ जणांविरोधात इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
शंभु बैल ग्रुपचे अध्यक्ष राहुल योगेश चावरे व प्रथमेश विनायक गायकवाड यांनी मिरवणूक काढली होती. यामध्ये ट्रॅक्टर क्रमांक MH10 H 1949 वर डॉल्बी साउंड सिस्टीम लावण्यात आली होती. त्या साउंडवर गाणी वाजवून एका काळ्या साडीतील महिलेकडून ट्रॅक्टरवर उभं राहून अश्लील नृत्य करवण्यात आले. यावेळी डॉल्बी सिस्टीमचे चालक आदित्य दादासो शेळके होता.
पोलिसांनी सूचना दिल्यावरदेखील खालील आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करत नाच सुरू ठेवला:
राहुल चावरे, प्रथमेश गायकवाड, आदित्य शेळके, सागर तोरे, सुरज बन्ने, संकेत नाकार्डे, अंकुश हुल्लोळी, सलमान नदाफ, विशाल देसाई, सुधीर मडिवाळ, अविनाश पडियार, श्रेयस जोशी, धिरज मगदुम, तेजस कुरणे आणि एक अज्ञात महिला.
या प्रकारामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला.बाजीराव पोवार यांच्या फिर्यादीवरून इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







