ICHMH51NEWS.IN
9921600800

कबनूरमध्ये एकाच दिवशी  परस्परविरोधी दोन तक्रारी,परस्परविरोधी गुन्हे दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कबनूरमध्ये एकाच दिवशी  परस्परविरोधी दोन तक्रारी,परस्परविरोधी गुन्हे दाखल

इचलकरंजी:
 कबनूर येथील लक्ष्मी माळ परिसरात १२ जून रोजी रात्री आणि सकाळी  दोन हाणामारीच्या घटना घडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिला प्रकार रात्री ९.३० वा. घडला. सदाशिव निगाप्पा पट्टणकुडे (५०) हे पोपट गणपती चौगुले यांच्या मागाच्या कारखान्यात पान्हा मागणी करण्यासाठी गेले असताना चौगुले यांनी शिवीगाळ करून हातातील लाकडी माऱ्याने त्यांच्या डोक्यात माराहण केली. याचा तपास सहा. फौ. अबिटकर करीत आहेत.
दुसरा प्रकार त्याच दिवशी सकाळी १०.३० वा. चौगुले यांच्या घरासमोर घडला. पहिल्या हल्ल्याचा राग मनात धरून प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादी कुलदीप गणपती चौगुले यांनी केला आहे. त्यानुसार शुभम सदाशिव पट्टणकुडे (२५) व तीन अनोळखी साथीदारांनी घरात घुसण्याचा प्रयत्न करून काठी, बाटल्या, दगड व धारदार शस्त्रांनी घराच्या खिडक्या-दरवाजांचे तसेच मोटारसायकलचे नुकसान केले. या घटनेचा परुळे तपास करीत आहेत.
दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा