बिकट परिस्थितीत संघर्ष कसे करावे,ते शिकायचे असेल तर ते महामानव स्व.प्रताप होगाडे यांच्याकडून शिकावे:- परवेज सिद्धीकी नागपूर
इचलकरंजी :- येथील समाजवादी पार्टी इचलकरंजी च्या वतीने महाराष्ट्राचे वीज ग्राहक संघटनेचे संस्थापक, समाजवादी पार्टी महाराष्ट्राचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष, स्वर्गीय वीजतज्ञ,प्रताप होगाडे. यांच्या ७५ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे अनावरण भावपूर्ण वातावरणात समाजवादी पार्टीचे प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्धीकी नागपूर,यांच्या हस्ते व प्रदेश उपाध्यक्ष पी.डी.जोशी.पाटोदेकर, नांदेड. यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाले.
Advt
या कार्यक्रमात आलेल्या सर्वच मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल देऊन प्रामुख्याने गोविंद ढवळे, जाविद मोमीन, ॲडव्होकेट दिनकर कुरकुटे,दिनेश कुलकर्णी, यांच्या हस्ते करण्यात आले.स्वर्गीय प्रताप होगाडे यांचा सहवास, मार्गदर्शन,व साथ, मिळालेचे अनुभव व्यक्त करीत असताना, प्रामुख्याने उषा कांबळे, गोविंद ढवळे, अण्णासाहेब क्वाने, नांदणी,नितीन मिरजकर सांगली,कृष्णा देवानंद रोचकरी,समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव. शिवाजीराव परुळेकर, प्रमुख महासचिव. अनिस अहमद पुणे.यांनी मनोगते व्यक्त केली.तर प्रमुख पाहुणे समाजवादी पार्टीचे प्रदेश प्रमुख महासचिव, परवेज सिद्धीकी नागपूर. म्हणाले की ८० टक्के समाजकारण, व २० टक्के राजकारण, करण्याची शिकवण व बिकट परिस्थितीत प्रवाह विरुद्ध कार्य करण्याचे, व संघर्ष कसा करावयाचे, असेल तर ते महामानव म्हणून स्वर्गीय प्रताप होगाडे.यांच्याकडूनच आम्ही शिकलो असे मत त्यांनी मानले.
Advt
शेवटी समाजवादी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष पी.डी.जोशी. पाटोदेकर नांदेड.यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमात प्राजक्ता होगाडे व होगाडे परिवार,स्वर्गीय प्रताप होगाडे यांचे चाहते, कार्यकर्ते,उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय होगाडे,प्रास्ताविक समाजवादी पार्टी इचलकरंजी चे अध्यक्ष, जाविद मोमीन यांनी केले.शेवटी आभार रिटा रॉड्रीग्युस यांनी मानले.
फोटो-
स्व.प्रताप होगाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना उपस्थित मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







