इचलकरंजीत सोशल मिडियावरून महिलेकडून ४२ लाखांची ऑनलाईन फसवणूक
इचलकरंजी
शहरातील एका व्यावसायिकाची तब्बल ₹४२,४३,२०६/- रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी धनंजय केरबा ठिगळे (वय ४०, व्यवसाय – प्रोसेस ब्रोकरेज, रा. गुरुकन्नननगर, इचलकरंजी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनश्रेया जैन या महिलेनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक व टेलीग्रामच्या माध्यमातून Plus500 कंपनी नावाने मोठा परतावा मिळेल, असे सांगून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.तिने फिर्यादीला एक वेबसाईट लिंक पाठवून त्यावर रजिस्ट्रेशन करून ३१ मार्च ते ४ जून २०२५ या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादीने सांगितलेल्या खात्यांमध्ये पैसे भरले. मात्र, कोणताही परतावा न मिळता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली.
या प्रकरणाचा तपास पो.स.ई. प्रदीप जाधव हे करत असून प्रभारी अधिकारी म्हणून पोनि दिलीप पवार काम पाहत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







