ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यान्वित

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यान्वित

इचलकरंजी :

शासनाच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिका विविध उपाययोजना सातत्याने राबवत आहे. संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधता यावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने २४ तास कार्यरत आपत्ती व्यवस्थापन संपर्क कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

आपत्तीग्रस्त किंवा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत व उपाययोजना राबवता याव्यात, यासाठी खालील संपर्क क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत:

आपत्ती व्यवस्थापन संपर्क कक्ष दूरध्वनी क्रमांक:
१) ०२३० – २४२१४५१
२) ०२३० – २४२१४५२
३) ०२३० – २४२१४५३

टोलफ्री क्रमांक: १८००२३३१२१७

या क्रमांकांवर नागरिकांनी आपत्कालीन प्रसंगी संपर्क साधावा, असे आवाहन इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांनी केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा