जलजन्य आजारासाठी इमनपा आरोग्य विभागाची जनजागृती मोहीम
इचलकरंजी:
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावभाग परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
Advt
ही मोहीम मा. आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
या जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांबाबत तसेच कावीळ, कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार यांसारख्या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबाबत माहिती देण्यात आली. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत रॅली काढण्यात आली.कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते आणि माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी नागरिकांना आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे आवाहन केले.या मोहिमेत डॉ. नितीन भाट, स्वच्छता निरीक्षक करण लाखे, सुरज नेतले, हिवताप निरीक्षक महादेव इंदलकर, संदीप गावडे, आरोग्य सेवक निहाल मुल्ला, जावेद मुल्ला, तसेच जिल्हा हिवताप कार्यालय कोल्हापूरचे प्रतिनिधी दीपक गेजगे, महेश वल्हेर आदींसह कलावंत गल्ली नागरी आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जलजन्य मोहिमेत जनजागृती करताना मा.नगरसेवक संजय तेलनाडे व महानगरपालिका कर्मचारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








