स्मृती जागरची बहारदार गानमैफल संपन्न
इचलकरंजी:
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली १९७४ साली इचलकरंजीत झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्मृती जागर सोहळा वर्षभर साजरा होत आहे.त्यातील सहावे पुष्प बहारदार
गान मैफलीने संपन्न झाले.स्वागत दिलीप शेंडे यांनी केले.प्रास्ताविक प्रा. रोहित शिंगे यांनी केले. प्रारंभी राजर्षी शाहू महाराज आणि बालगंधर्व यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. या मैफलीत पुकारता चला हूं मैं ,छू लेने दो नाजुक होठोंको (अरूण दळवी)
ये रेशमी जुल्फे ,मैं कहीं कवी ना बन जाऊं (प्रा.मिलिंद दांडेकर )कभी कभी मेरे दिलमें (ॲड. बाबासाहेब निकम)आपकी आंखोमें कुछ ,चिंब पावसानं झालं( केतकी पाटील / बाबासाहेब निकम )कई बार युं ही देखा हैं, अय मेरी जोहराजबी ( प्रविण होगाडे)चांदणे शिंपीत जाशी ,चैन से हमको कभी (डॉ.मृदुला कुलकर्णी)हम थे जिनके सहारे (केतकी पाटील ),राम करे ऐसा हो जाये ( विजय यादव)
करीना आय लव्ह यू ( शरद इनामदार , श्रेया इनामदार)चाहूँगा मैं तुझे सांज सवेरे ( रेखा पाटील ), रात का समा झूमे चंद्रमा , आजकल पांव जमी पर नहीं पडते मेरे(सुनीता कळंत्रे ), हमे तुमसे प्यार कितना ( विजयकुमार हावळे), कानडा राजा पंढरीचा (स्वाती गोंदकर), प्यार दिवाना होता है (प्रतीक अग्निहोत्री), फिर वही रात है (अजिंक्य वाळवेकर), जीवन से भरी तेरी आँखें (अजित भिडे), रिमझिम गीरे सावन (महेश सटाले) मैं शायर बदनाम, चंद रोज और मेरी जान चंद रोज (प्रशांत होगाडे) शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले (सौरभ पाणदारे )अशी काही गाणी अतिशय सुरेख पद्धतीने सादर करण्यात आली.
Advt
ॲड. माधुरी काजवे यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केले.सर्व गाण्यांचे मूळ गायक, संगीतकार, चित्रपट प्रसंग यांची माहिती सांगत त्यांनी मैफलीत रंग भरला. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा.मिलिंद दांडेकर यांनी उत्तमरितीने केले.प्रशांत होगाडे यांनी उत्तम ध्वनी संयोजन केले.दीपश्री व दिलीप शेंडे यांच्या स्वानंदी निवासस्थानी ही गानमैफल झाली. यावेळी प्रसाद कुलकर्णी, वैशाली नायकवडी, माधव देवधर, सी.पी. कोरे,सुवर्णा पवार,अभिजित काटकर, ॲड. भैय्या कुलकर्णी ,
प्रसाद नाईक, चंदकांत रानडे , अभय पोतदार, कमल रेळेकर, सुखदा देशपांडे, रोहिणी कुलकर्णी, विदुला नातू, शाहीर संजय जाधव, रविकिरण उकिडवे, विजय पोरे यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते.
फोटो : गान मैफल श्रवणीय करणारे सर्व गायक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







