यशवंत प्रोसेसची आधुनिकीकरणाकडे वाटचाल : अहमद मुजावर
इचलकरंजी –
यशवंत प्रोसेसर्स या संस्थेची सर्वांच्या सहकार्यातून आधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरु आहे. संस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु असून अहवाल सालात संस्थेस 5 लाख रुपये इतका नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अहमद मुजावर यांनी सांगितले.
इचलकरंजीतील प्रोसेसिंग व्यवसायातील जुनी नामवंत संस्था दि यशवंत को-ऑप प्रोसेसर्स या संस्थेची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन चेअरमन मुजावर बोलत होते. त्यांनी अहवाल सालातील संस्थेच्या प्रगतीचा विस्तृत आढावा सादर केला.
यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी, यशवंत प्रोसेस ही मातृसंस्था असून ती चांगली चालली पाहिजे. त्यासाठी लागेल ते सर्वतोपरी सहकार्य करु अशी ग्वाही दिली. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन, संस्थेचे मागर्दर्शक स्वप्निल आवाडे यांनी, संस्थेच्या प्रगतीसाठी विविध नवनवीन योजना आखल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून यशवंत संकुल बांधण्यात आले आहे. त्याचा दुसरा टप्पा पूर्वेकडील बाजूसही असेच संकुल बांधण्यात येणार असल्याचे सांगितले.
Advt
स्वागत संस्थेचे संचालक मोहन काळे यांनी केले. व्यवस्थापक शफिक मणेर यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या अध्यक्षा सौ. वैशाली आवाडे संचालक सर्वश्री आदित्य आवाडे, मुकुंद पोवार, चंद्रकांत घाटगे, श्रेणिक मगदूम, रवि जावळे, रणजितसिंह गायकवाड, आनंदा दोपारे, रमेश कबाडे, राजेश भिसे, सुहास कांबळे, जेवरबानू दुंडगे आदींसह मान्यवर व सभासद उपस्थित होते. आभार संस्थेचे व्हा. चेअरमन राजाराम बोंगार्डे यांनी मानले. सूत्रसंचालन संचालक अरुण निंबाळकर यांनी केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







