ICHMH51NEWS.IN
9921600800

रंगी रंगला श्रीरंग” भक्तिगीत संध्याकाळ रसिकांच्या मनावर उमटली भक्तिरसाची गोड साद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रंगी रंगला श्रीरंग” भक्तिगीत संध्याकाळ रसिकांच्या मनावर उमटली भक्तिरसाची गोड साद.

इचलकरंजी-
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त इचलकरंजी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात “रंगी रंगला श्रीरंग” या भक्तिगीत व भावगीत संध्याकाळी रसिक श्रोत्यांच्या मनावर भक्तिरसाची वर्षा केली. रविवार ६ जुलै रोजी सायंकाळी झालेल्या या विशेष कार्यक्रमाचे आयोजन श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले होते.
  कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जवाहर छाबडा, चेअरमन राजेंद्र राशीनकर, उपाध्यक्ष पंकज मेहता तसेच संचालक मंडळ उपस्थित होते. सूत्रसंचालन नरोत्तम लाटा यांनी केले.
  या भक्तिमय संध्याकाळी “फिरत्या चाका वरती”, “माझे माहेर पंढरी”, “अवघा रंग एक झाला”, “देह विठल”, “गेला हरी कुण्या गावा”, “दिंडी चालली”, “भक्त पुंडलिकासाठी” अशा एकाहून एक सुरेल आणि भावस्पर्शी गीतांनी रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
Advt
  कार्यक्रमाचे निर्माते अविनाश सूर्यवंशी तर सादरकर्ते गायक मुकुंद चौगुले होते. त्यांच्यासोबत गायिका नीता ठाकूर-देसाई यांनी सुरेल गायन सादर केले. सहगायक सतीश यळसंगी व सहगायिका स्नेहा संकपाळ यांनी गायनात साथ दिली. वाद्यसंगतीत रिदमवर ऋतिक कुरणे, तबल्यावर राजू पाटील, ढोलकीवर रमजान बालेखान, हार्मोनियमवर संग्राम कांबळे व बासरीवर डॉ. सचिन जगताप यांनी सुंदर साथ केली.
  नेपथ्य सुदाम साळुंखे यांचे तर ध्वनी व प्रकाश योजनेची जबाबदारी प्रशांत होगाडे (होगाडे जॉबर) आणि ऋषिकेश ठाकूर-देसाई यांनी पार पाडली. निवेदक साहिल शेख यांनी आपल्या सोज्वळ, भावपूर्ण निवेदनशैलीतून संपूर्ण कार्यक्रम अधिक प्रभावी केला.
कार्यक्रमात पतसंस्थेच्या संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विठ्ठलनाम घेऊन दिंडी काढली. त्या दिंडीला उपस्थितांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भरभरून दाद दिली. भक्तिरसात न्हालेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा