ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापूर येथे जबरदस्तीने दुचाकी व रोख रक्कम हिसकावली; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापूर येथे जबरदस्तीने दुचाकी व रोख रक्कम हिसकावली; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजी –

शहापूर पोलीस ठाणे हद्दीत सांगली नाका ते शहापूर रोडवरील स्नेहल बेकरी व किराणा समोर एका तरुणास जबरदस्तीने दुचाकी व रोख रक्कम हिसकावल्याचा प्रकार घडला असून, याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संदेश सुनिल पाटील (वय १८ वर्षे, व्यवसाय- हमाली, रा. आंबेडकर गल्ली नं. ०२, कबनूर, कोल्हापूर नाका, ता. हातकणंगले) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री १०.५० वाजण्याच्या सुमारास ते शहापूर येथे स्नेहल बेकरी समोरून जात असताना, आरोपी आदित्य लक्ष्मण भस्मे (वय २५ वर्षे, रा. इचलकरंजी) याने त्यांच्या अंगावर धाव घेऊन जबरदस्तीने ८०,००० रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी (आर.टी.ओ. नं. एमएच ०९ जीजी ४०५३, ग्रे रंग) व १,२०० रुपये रोख रक्कम हिसकावून नेली.

याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.स.ई. दरेकर हे करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा