ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत गांजा विक्री,७५ वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत गांजा विक्री,७५ वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल

इचलकरंजी

शांतीनगर येथून ७५ वर्षीय विलास रतनसिंग रजपूत याच्याकडून ३६८ ग्रॅम गांजा व अंमली पदार्थाचे पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश मंदिराजवळ करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विनापरवाना गांजा साठवून ठेवला असून, तो विक्रीसाठी वापरण्याचा उद्देश होता. रोख ११९० रुपये गांजा किंमत ७३६० रुपयांचा गांजा तसेच पॅकिंगसाठी लागणारे साहित्य – प्लास्टिक पिशव्या, स्टेपलर, वजन काटा आदी मिळून ७६९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.फिर्यादी पोलीस शिपाई अमर शिरढोणे यांच्या तक्रारीवरून  गुन्हा दाखल झाला असून, पो.स.ई. वाघमारे अधिक तपास करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा