ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीचा पाणीपुरवठा विस्कळीत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीचा पाणीपुरवठा विस्कळीत

इचलकरंजी
         इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणेत येत असलेल्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या मजरेवाडी कडून येणारी जुनी पाण्याच्या दाबनलिकेस कुरुंदवाड शहराजवळ शिकलगार वसाहतीजवळ जुन्या पाईपलाईला गळती लागल्यामुळे इचलकरंजी शहरास होत असलेला पाणी पुरवठा सकाळी ८. ०० वाजले पासून तातडीने बंद करणेत आलेला होता . गळती काढणेचे काम आजच दुपारी ४ वाजता पूर्ण करून घेतले आहे. दरम्यानच्या मुदतीत पाणी उपसा बंद ठेवनेत आला होता, त्यामुळे शहराचा पाणी विस्कळीत झाला आहे यामुळे शहरवासीयांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. याबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे.
सदर पाइपलाईनची गळती काढणेचे काम पुर्ण झाले असून शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करणेत येत आहे.
 तरी शहरातील नागरिकांनी आपल्या जवळचा उपलब्ध पाणी साठा जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेकडून करणेत येत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा