ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा – ३० जणांविरोधात गुन्हा, १,१७ लाख जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा – ३० जणांविरोधात गुन्हा, १,१७ लाख जप्त

इचलकरंजी – इचलकरंजी शहरातील सहारा संस्कृती मंडळाच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर इचलकरंजी पोलिसांनी अचानक छापा टाकून ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईत एकूण १,१७,८५०/- किमतीचा रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईत जुगार खेळताना नागेश राजाराम भोसले,रंगराव विष्णू पाडळकर,अमोल अशोक पाटील,अनिल बळवंत वाघमारे,पोहीद्दीन बाबासो जमादार,महेश अण्णा डांगे,दत्तात्रय चांगदेव यादव,तुकाराम गणपती धुचे,बसवराज गोदाप्पा आयगले,रिजवान महमद नदाफ,तौफिक शब्बीर पटवेगार,गणेश किसन वाळवट,संभाजी चंद्रकांत कवटगे,अनिल सिद्धार्थ मलकनावर,संतोष काळेबेरे,किरण उत्तरेश्वर देशमुख,संजय रमेश माने,राहुल सुभाष सावेकर,विठोबा महादेव कांबळे,संजय मारुती निर्मळ,विनेश नंदू कांबळे,अकबर खुदाबक्ष मिरजी,अंकुश पांडुरंग सुमाळ,विजय सुरेश कोरवी,मोहसीन झाकीर जमनावर,राहुल अमोल लोटके,आनंद कृष्णा कनगले,महादेव राजू बंडगर,ओंकार दत्तात्रय डाकरे, इमतीयाज बालम बागवान यांच्यावर गुन्हा नोंद केला असून यातील ८ जणांवर यापूर्वीही जुगारविषयक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये क्लबचा व्यवस्थापक व मालक देखील सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.वरील कारवाई पो.शिपाई अमर कदम यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे पुढील तपास रफीक पाथरवट करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा