ICHMH51NEWS.IN
9921600800

डिकेएएससीत जागतिक सहकार दिन कार्यक्रम संपन्न.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डिकेएएससीत जागतिक सहकार दिन कार्यक्रम संपन्न.

इचलकरंजी
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स व कॉमर्स महाविद्यालयात शनिवार दि ५ जुलै २०२५ रोजी ‘जागतिक सहकार दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील कॉमर्स विभागा द्वारे करण्यात आले.  कार्यक्रमाचे वक्ते कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. विजय पाटील हे होते, ते बोलताना म्हणाले की देशातील जनतेचा सामाजिक व आर्थिक विकास सहकाराशी संबंधित असून सहकाराचे अनेक चांगले परिणाम तसेच विविध प्रयोग सहकाराद्वारे यशस्वी झालेले आहेत, सहकारी चळवळीने मुलत: क्रांतिकारक कार्य तसेच अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका स्वीकारली आहे.
Advt
सहकारातून नेतृत्वाची निर्मिती, शिक्षणाचा विकासही शक्य झालेला आहे. सहकारातील प्रभावी संस्था म्हणून सहकारी साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या इ. प्रक्रिया संस्था तसेच सहकारी बँका, सहकारी गृहनिर्माण संस्था, ग्राहक भांडारे, शेती पाणीपुरवठा संस्था व प्राथमिक सहकारी संस्था इत्यादींचे लाभ  समाजातील तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ.एस. के.खाडे हे होते. ते बोलताना म्हणाले की  सहकारातील बदल, दुरुस्त्या, कायदे, रचना तसेच देखरेख व नियंत्रण इत्यादीची माहिती सहकारांशी संबंधित सर्व घटकांनी घेतली पाहिजे.  सभासदांची सहकारातील  निष्ठा व सहभाग वाढून  सहकारी चळवळ अधिक सक्षम बनविण्याचे ध्येय आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व हेतूकथन प्रा पूजा पारिशवाड यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून  सहकारी क्षेत्रात  विविध व्यक्तींचे योगदान यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी,  प्राध्यापक.प्रा.पल्लवी होगाडे, प्रा. कल्पना जाधव, प्रा. प्रथमेश गवळी,प्रा.आदिती ढोकरे, प्रा. कोमल कोळी इ. उपस्थित होते. शेवटी  आभार प्रा.डाॅ.आर एस. राॅड्रिक्स यांनी व्यक्त केले.
प्रा.विजय पाटील यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ एस के खाडे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा