ICHMH51NEWS.IN
9921600800

गांजाचे सेवन करताना तीन युवकांना शहापूर पोलिसांकडून अटक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गांजाचे सेवन करताना तीन युवकांना शहापूर पोलिसांकडून अटक

शहापूर (ता. हातकणंगले) येथे बौद्ध समाज मंदिराच्या मागे मोकळ्या जागेत गांजाचे सेवन करताना तिघांना शहापूर पोलिसांनी रंगेहात पकडले. अमेंदर प्रेमसिंग सिंग (२२), दिपककुमार बच्चासिंग सिंग (२४) व रमेशकुमार धर्मेंद्र सिंग (३६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार अर्जुन तुकाराम फातले यांच्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क) सह २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी गांजाचा वापर झालेली मातीची चिलीम सापडली. अधिक तपास पो.ह.कॉ. चळचूक करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा