महानगरपालिका कर विभाग सुट्टी दिवशी सुरु राहणार
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील मालमत्ताधारकांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील घरफाळा व पाणीपट्टी भरणा करणेचे कामकाज चालू आहे. त्यास उपरोक्त नागरिकांना माहे १५ जुलै २०२५ अखेर संयुक्त कराच्या दुसऱ्या सहामाही मध्ये १०% सवलत मिळणे कामी मुख्यालय इमारती व A, B, C, D झोन कार्यालयांमध्ये शनिवार दि.१२/०७/२०२५ रोजी वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत घरफाळा व पाणीपट्टी भरून घेण्याचे कामकाज सुरु राहणार आहे.
तरी नागरिकांनी आपल्या मिळकतीचा घरफाळा व पाणीपट्टी भरून महानगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेकडून करणेत येत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







