हॉटेल वुड हाऊसजवळील गल्लीत मक्तेदाराने ड्रेनेज फोडले; नागरिक संतप्त, आंदोलनाचा इशारा.
बघा व्हिडीओ
https://youtube.com/shorts/DfZMUVQeXsI?si=cbWaeqWV4jUCXf1U
इचलकरंजी –
हॉटेल वुड हाऊसजवळील गल्लीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मक्तेदाराने गटारीचे काम करताना जेसीबीच्या साहाय्याने नागरिकांचे ड्रेनेज उखडून टाकले. नागरिकांनी विचारणा केली असता, “ड्रेनेज फुटले ते माझ्या अंदाजपत्रकात नाही, त्यामुळे तुमचे तुम्ही पाहून घ्या,” असा अजब सल्ला मक्तेदाराने दिल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले आहेत.
या प्रकाराबाबत महापालिकेला विचारले असता, त्यांनीही हात वर केले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
विकासकामे करताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे नुकसान करणे, हे ठेकेदारांच्या करारात नमूद आहे का? आणि अशा चुकीस जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ड्रेनेज व्यवस्था तत्काळ पूर्ववत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून, संबंधित मक्तेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







