श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.
इचलकरंजी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी राज्य आणि जिल्हा पातळीवर उत्कृष्ट यश संपादन करत शाळेच्या गुणवत्तेचा झेंडा उंचावला आहे.
प्रशालेची विद्यार्थिनी कु. संस्कृती संतोष आबाळे हिने २७८ गुणांसह महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक मिळवला. तिच्या या घवघवीत यशामुळे शाळेच्या नावलौकिकात मोलाची भर पडली आहे.
Advt
तसेच कु. ईशा विनायक कांबळे हिने २६० गुणांसह ४१ वा क्रमांक, आणि कु. गार्गी संभाजी पोवार हिने २५४ गुणांसह ५४ वा क्रमांक मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले. त्यांनीही शाळेची गुणवत्ता परंपरा जपली आहे.
या यशस्वी कामगिरीमागे श्री. ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा, चेअरमन कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन उदयजी लोखंडे, सेक्रेटरी बाबासाहेब वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन मारुतरावजी निमनकर यांची प्रेरणा लाभली.
तसेच मुख्याध्यापिका सौ. ए.एस. काजी, उपप्राचार्य व्ही.जी. पंतोजी, पर्यवेक्षक एस.एस. कोळी, सौ. व्ही.एस. लोटके, स्कॉलरशिप विभाग प्रमुख सौ. आर.एस. रॉड्रीग्युस, तसेच सर्व शिक्षकवृंदांचे उत्कृष्ट मार्गदर्शन, अभ्यासाचे नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यामुळेच विद्यार्थिनींनी हे यश संपादन केले.विद्यार्थिनींच्या या अपूर्व यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी आणि समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







