डीकेएएससी कॉलेज मध्ये जागतिक लोकसंख्या दिन संपन्न.
इचलकरंजी
इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मध्ये अर्थशास्त्र विभागामार्फत ११ जुलै 2025 रोजी जागतिक लोकसंख्या दिनाचे आयोजन करण्यात आले. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी विभागप्रमुख प्रो.विलास बी. पाटील लाभले ते बोलताना म्हणाले, लोकसंख्या दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांचे महत्व जगाचे लक्ष केंद्रित करणे आणि जगभरातील वाढत्या लोकसंख्येच्या परिणामांबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे. लोकसंख्येच्या समस्यांमध्ये कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, बालविवाह, मानवी हक्क, माता आरोग्य, बाल आरोग्य, बेरोजगारी, पाण्याची कमतरता, संसाधनांची अनुपलब्धता इत्यादींचा समावेश आहे. थॉमस मालथ्स यांच्या लोकसंख्या सिद्धांताचा उल्लेख केले. तसेच लोकसंख्या वाढ-घट हा विषय वादग्रस्त आहे. परिस्थिती सापेक्ष सर्व गोष्टींचा उल्लेख त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये केला. वाढत्या लोकसंख्येमध्ये स्त्रि-पुरुषांच्या वाढीच्या दराचे उल्लेख त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये करण्यात आला. भारत हा तरुणांचा देश तसेच आर्थिक विकासामध्ये लोकसंख्येचा सहभाग याचाही उल्लेख करण्यात आला. अनेक उदाहरणे देऊन इतर देशांच्या लोकसंख्येचा देखील उल्लेख केला. विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात मार्गदर्शन केले.
Advt
या कार्यक्रमाचे स्वागत-प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.अशोक बोगुलवार सर यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.एस.के.खाडे हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कॉमर्स विभागप्रमुख व्ही.पी.पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकसंख्या विषयातील वास्तविकता आणि आजची लोकसंख्या अशा अनेक बाबी वर मार्गदर्शनकेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एस. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ व्ही.आर. शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक लोकसंख्या कार्यक्रमात बोलताना प्रा.विलास पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







