ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत कचरा संकलनात मोठा गैरव्यवहार? महाविकास आघाडीची आयुक्तांकडे चौकशीची मागणी,अति आयुक्तांच्या अहवालानंतर कारवाईचा निर्णय.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत कचरा संकलनात मोठा गैरव्यवहार? महाविकास आघाडीची आयुक्तांकडे चौकशीची मागणी,अति आयुक्तांच्या अहवालानंतर कारवाईचा निर्णय.

इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासकीय हद्दीत घंटागाडीव्दारे घरोघरी कचरा संकलन आणि वाहतूक करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केला आहे.याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे सखोल चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याची आणि दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेने वार्षिक ७.३४ कोटी रुपयांचे आणि दोन वर्षांसाठी १४.६८ कोटी रुपयांचे टेंडर एनडीके हॉस्पिटॅलिटी एलएलपी फलटण या कंपनीला दिले असून ११ ऑक्टोबर २०२४ पासून काम सुरू आहे. मात्र, प्रतिदिन कामासाठी लाखो रुपये दिले जात असतानाही कचरा संकलन अपूर्ण,अनियमित असून, जीपीएस,वाहनांची दुरुस्ती,कामाचे रेकॉर्ड,बिलांची पारदर्शकता या सर्व बाबतीत गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे.
Advt
घंटागाडी,जेसीबी,टिपर,क्रेन यांचा वापर अपुरा असून वारंवार संपामुळे नागरिक हैराण झाले आहेत. काही वाहनांची रिपेअरिंग खासगी गॅरेजकडे करूनही त्याचे बिल अदा झाले की नाही,याबाबतही शंका उपस्थित केली आहे.
महाविकास आघाडीने यामध्ये प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आणून दिले असून दोषींवर कारवाईसह नुकसान भरपाई वसूल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत आयुक्तांनी अति आयुक्त सुषमा शिंदे यांची एकसदस्यीय समिती स्थापन केली असून त्यांना ४ दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
निवेदनावर शशांक बावचकर,सागर चाळके,प्रकाश मोरबाळे,उदयसिंग पाटील,सदा मलाबादे,सयाजी चव्हाण,अमरजीत जाधव,राजू आलासे यांच्या सह्या आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा