ICHMH51NEWS.IN
9921600800

स्वच्छ सर्वेक्षण अभियान – २०२४ इचलकरंजी महानगरपालिका देशात ३३ व्या तर राज्यात १६ व्या क्रमांकावर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्वच्छ सर्वेक्षण अभियान – २०२४ इचलकरंजी महानगरपालिका देशात ३३ व्या तर राज्यात १६ व्या क्रमांकावर

इचलकरंजी
केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेयर्स अंतर्गत स्वच्छ भारत मिशन नागरी २.० मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये इचलकरंजी शहराची ५० हजार ते ३ लाख लोकसंख्येच्या गटात आज अखेरची उच्चंतम कामगिरी करून देशात ३३ व्या क्रमांकावर (८२४ पैकी) झेप घेतली असून राज्यात १६ व्या क्रमांकावर (६६ पैकी) आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये घरोघरी कचरा संकलन, कचरा विलगीकरण, कचरा प्रक्रिया, कचरा तक्रारींचे निवरण, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, व्यावसायिक रहिवासी व मार्केट क्षेत्र स्वच्छता, जलस्रोत व सार्वजनिक शौचालय स्वच्छता तसेच स्वच्छता ही सेवा, कोंडाळा मुक्त रस्ते व ब्लॅक स्पॉट सुशोभीकरण आदींचा  समावेश झाला आहे.
Advt
तसेच हागणदारी मुक्त शहर मनानंकांनामधील सर्वोच्च मानांकन Water+ प्राप्त झाले ज्यामध्ये STP व्यवस्थापन व शौचालय स्वच्छता या बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर कचरा मुक्त शहर स्टार रेटिंग मानांकना मध्ये इचलकरंजी शहराला पहिल्याच वेळी १ स्टार मनांकन मिळाले आहे. इचलकरंजी शहराचा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आज अखेरची उच्चतम कामगिरी असून देशात २१० वरून ३३ व्या क्रमांकावर तर राज्यात ३४ वरून १६ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या उच्चतम कामगिरीमध्ये  आयुक्त तथा प्रशासक  पल्लवी पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले असून  अतिरिक्त आयुक्त  सुषमा शिंदे-कोल्हे तसेच उपायुक्त अशोक कुंभार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. इचलकरंजी करिता उच्चतम कामगिरी कारण्यामध्ये विशेष सहभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, सर्व विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, शहर समन्वयक प्रविण बोंगाळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ, मंगेश दुरुगकर व रफिक पेंढारी तसेच शौचालय विभाग नियंत्रक स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव, स्वच्छता निरीक्षक सुरज माळगे, किरण लाखे, सचिन भुते, बबन कांबळे, संग्राम भोरे, सुरज पांगरे, संदीप मधाळे, पेत्र भोरे, संदीप कांबळे, विशाल आवळे, प्रशिक्षणार्थी स्वच्छता निरीक्षक, मुकादम व स्वच्छता कर्मचारी यांचे विशेष प्रयत्न लाभले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा