ICHMH51NEWS.IN
9921600800

राज्य गुणवत्ता धारक तलहा नदाफ याचा सत्कार जिल्हा परिषद कोल्हापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांच्या हस्ते संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य गुणवत्ता धारक तलहा नदाफ याचा सत्कार जिल्हा परिषद कोल्हापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांच्या हस्ते संपन्न

हातकणंगले-
गुरुवार रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांचा हातकणंगले तालुका नियोजित दौऱ्यावर असताना  उर्दू विद्या मंदिर माणगाव येथील विद्यार्थी कु.तलहा नदाफ हा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे समजताच भेटण्याचे निरोप पाठवला वावदुपारी हातकणंगले मध्ये उर्दू माणगाव चे मुख्याध्यापक इरफान पटेल व विषय शिक्षक सरफराज पिरजादे यांनी तलहा नदाफ याला घेऊन आले सोबत केंद्र प्रमुख इम्तियाज म्हैशाळे हातकणंगले विश्रामगृहात उपस्थित होते.तलहा नदाफशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हितगुज करत त्याचा यथोचित असा सत्कार केला.
Advt
एस.कार्तिकेयन यांचा मोठेपणा
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा दुपारी नरंदे व सावर्डे दौरा होता त्यांनी म्हैशाळे सरांना सांगून आपल्या गाडीत तलहाला बसवून घेतले व गप्पागोष्टी सुरू झाल्या,साहेबांनी विचारलं बाळ तू काय होणार?तलहा ने धाडसाने म्हणाला मला आय ए एस व्हायचे आहे,साहेबांनी लगेच दुसरा प्रश्न टाकला आयएएस होऊन तू काय करणार? लगेच तलहा म्हणाला मला आपल्या  कोल्हापुराला राज्यात एक नंबर आणायचा आहे, साहेब हसले आणि म्हणाले तलहा तू आय ए एस झाल्यावर मला येऊन नक्की भेट कदाचित त्यावेळी मी मंत्रालयात सचिव म्हणून असेल त्यानंतर पुढे प्रवास सुरू झाला भरपूर गप्पागोष्टी झाल्यानंतर नरंदेच्या जल जीवन प्रोजेक्ट ला भेट दिली तिथे पुन्हा तलहाचा सत्कार झाला त्यानंतर त्याला सोबत घेऊन साहेब सावर्डे ला निघाले व  साहेबांनी तलहाला निरोप दिला व शेवटी आपल्याकडील दोन पेन त्याला भेट स्वरूपात दिले सदर सत्कार प्रसंगी हातकणंगले तालुक्याचे गट विकास अधिकारी श्रीमती शबाना मोकाशी ,गटशिक्षणाधिकारी प्रकाश नलवडे ,विस्तार अधिकारी जे. टी .पाटील उर्दू केंद्रप्रमुख इम्तियाज म्हैशाळे उर्दू माणगाव चे मुख्याध्यापक इरफान पटेल ,विषय शिक्षक सरफराज पिरजादे ,इमरान जमादार उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा