धर्मांतर प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी व्हावी : आमदार आवाडे
इचलकरंजी –
हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडले जात असल्याच्या घटना राज्यभरात घडत आहेत. हे रोखण्यासाठी धर्मांतर प्रतिबंध कायदा अंमलात आणण्याची मागणी सातत्याने होत आहे. या संदर्भात निर्णयात्मक कार्यवाही करून कायदा अंमलात आणावा, असा औचित्याचा मुद्दा शुक्रवारी आमदार राहुल आवाडे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडला.
आमदार आवाडे म्हणाले, मागील काही वर्षात राज्यभरात हिंदू मुली आणि हिंदुत्ववादी संघटनांवर होणारे अन्याय व बळजबरीने होणार्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने धर्मांतर प्रतिबंध कायदा अंमलात आणवा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून प्रदीर्घकाळापासून करण्यात येत आहे. या मागणीसाठी राज्यात सुमारे 32 मोर्चे काढण्यात आले. हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना वेगवेगळी प्रलोभने दाखवून त्यांना बळजबरीने दुसरा धर्म स्विकारण्यासाठी म्हणजे धर्मांतर करण्यासाठी भाग पाडले जात आहे. राज्यभरात अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. त्याला वेळीच आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. नुकतीच इचलकरंजी शहरात जून 2025 मध्ये अशीच एक घटना घडली. त्यातूनच शासकीय आवारातच प्रार्थना करण्यात आल्याने त्याला विरोध दर्शवत कारवाईची मागणी करणार्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मागे घेण्यासह शासकीय आवारात प्रार्थना करणार्यांवर कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी कार्यकत्यांना पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन करावे लागले. म्हणून धर्मांतरासाठी बळजबरी करणार्या घटनांना चाप लावण्याची गरज आहे. यासाठी शासनाने हिंदुत्ववादी संघटनांकडून होत असलेल्यवा मागणीच्या अनुषंगाने धर्मांतर प्रतिबंध कायदा अंमलात येण्यासाठी तातडीने निर्णयात्मक कार्यवाही करावी, मागणी केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







