ICHMH51NEWS.IN
9921600800

लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

इचलकरंजी :
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा येथील लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात लायन गजानन होगाडे यांनी ध्वजवंदन वाचनाने केली व प्रमुख पाहुणे यांची ओळख लायन राकेश धूत यांनी केली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन एमजेएफ ला. द्वारका जालान हे उपस्थित होते.
Advt
 गेली ६५ वर्षे समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या समाजसेवेचा ठसा उमटवून लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीने जनतेच्या मनामध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले. यापुढील काळातसुद्धा समाजातील गरजवंत घटक नजरेसमोर ठेऊन मंडळास सेवाकार्याचे आयोजन करावे असे आवाहन ला. द्वारका जालान यांनी केले. ते लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या पदग्रहण सोहळ्यात बोलत होते.
नूतन वर्षासाठी अध्यक्षपदी ला. संदीप सुतार, सचिवपदी ला. सचिन येलाजा, खजिनदार पदासाठी ला. अमित पोद्दार, क्लब प्रशासक ला. लिंगराज कित्तुरे आणि इतर संचालक मंडळास ला. द्वारका जालान यांनी अधिकारपदाची शपथ दिली. मावळत्या अध्यक्षा ला. हेमा डाळ्या यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांना पदभार देण्यात आला. यावेळी द्वितीय उप प्रांतपाल डॉ.किरण खोराटे, माजी प्रांतपाल विजयकुमार राठी, माजी प्रांतपाल सुनील सुतार, माजी प्रांतपाल वासुदेव कलघटगी, माजी प्रांतपाल आण्णासाहेब गळतगे आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रिजन चेअरमन ला. डॉ. सुनिल चव्हाण, झोन चेअरमन ला. महेंद्र बालर, ला. मंगेश दोशी, सुरेश पाटील, के .के. जोशी आणि मोठ्या संख्येने लायन सदस्य व निमंत्रित उपस्थित होते. ला. सुषमा दातार यांनी सूत्र संचालन केले. आभार  सचिव ला. सचिन येलाजा यांनी मानले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा