ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहरातील अमली पदार्थविरोधी संयुक्त कारवाईसाठी महाविकास आघाडी आक्रमक. प्रांताधिकाऱ्याकडे मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहरातील अमली पदार्थविरोधी संयुक्त कारवाईसाठी महाविकास आघाडी आक्रमक. प्रांताधिकाऱ्याकडे मागणी

इचलकरंजी, दि. २५ जुलै २०२५
इचलकरंजी शहर व परिसरामध्ये वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या सेवन व विक्रीविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी प्रांताधिकारी कार्यालय, इचलकरंजी येथे निवेदन देण्यात आले.

महाविकास आघाडीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या काही महिन्यांमध्ये कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात कोकण चरस, गांजा, मेफेडॉन इत्यादी अमली पदार्थांचे सेवन व विक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचे लोण आता इचलकरंजी शहरातही पोहोचले असून १५ ते २२ वयोगटातील तरुणाई यामध्ये अडकत आहे. परिणामी, गुन्हेगारीचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहे.

विशेषतः कामगारप्रधान असलेल्या या शहरामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या लक्षणीय असून, अलीकडेच कोरोची भागातील एका सॉफ्टवेअर इंजिनियरकडून लाखो रुपयांचे ड्रग्स जप्त केल्याची घटना धक्कादायक ठरली आहे. त्यामुळे या समस्येवर संयुक्तपणे कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली.

महाविकास आघाडीने प्रांताधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, गावभाग पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, शहापूर पोलीस स्टेशन व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीने संयुक्त बैठक बोलावून कारवाईचे आदेश द्यावेत.

या निवेदनप्रसंगी शशांक बावचकर, उदयसिंग पाटील,हेमंत वणकुंद्रे,सदा मलाबादे,प्रमोद खुडे,प्रकाश मोरबाळे,सयाजी चव्हाण,सुनील बारवाडे,वसंत कोरवी हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा