तृतीयपंथीयांमध्ये वाद – तलवार, दगड व पोलने हल्ला; गुन्हा दाखल
इचलकरंजी
शहापूर :
यड्राव येथील रेणुकानगर भागात भीक्षा मागण्याच्या पैशावरून झालेल्या वादातून तृतीयपंथीय व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकावर तलवार, दगड व सिमेंट पोलने हल्ला करून नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहापुर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गोविंद उर्फ सिया संजय चिकुर्डे (वय २८, तृतीयपंथी, रा. रेणुकानगर, यड्राव, ता. शिरोळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री राहते घरी आरोपी प्रशांत भरत सवाईराम (वय २८, तृतीयपंथी), गणेश बजरंग नेमिष्टे (वय ३०, पुरुष), व मनिषा भरत सवाईराम (वय ३६ महिला) हे तिघे जण आले.
फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वी पैशाच्या कारणावरून वाद झाला होता. आरोपी प्रशांत याने २३ जुलै रोजी फोन करून पैसे मागितले होते. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली होती. यावरून आरोपींनी राग मनात धरून संगनमताने हल्ला केला.
हल्ल्यात आरोपींनी फिर्यादीची मोपेड (MH 51 9054) सिमेंट पोलने फोडली, घराच्या खिडकीच्या काचा व टीव्ही दगडाने फोडले. आरोपी गणेश याने फिर्यादीच्या तोंडावर मारले आणि तलवारीने हल्ला केला. आरोपी मनिषा हिने खिडकीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात अंदाजे ४,०००/- रुपयांचे नुकसान झाले.
पोलीसांनी घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला आहे.गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







