ICHMH51NEWS.IN
9921600800

ढोल-ताशांच्या गजरात गुणवंत विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक, आयुक्तांसह मान्यवरांचा सहभाग.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ढोल-ताशांच्या गजरात गुणवंत विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक, आयुक्तांसह मान्यवरांचा सहभाग.

बघा व्हिडीओ https://youtube.com/shorts/uH8vx7TdpVI?si=A2nsokvFc5ybcuCJ 

इचलकरंजी:
इचलकरंजीतील हुतात्मा बाबू गेणू विद्यामंदिर क्र. २८ येथे सन २०२४-२५ मधील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरावर गुणवत्तापूर्ण यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीने गौरव करण्यात आला.

या भव्य मिरवणुकीत इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त सौ. पल्लवी पाटील मॅडमश्री. शिक्षणाधिकारी कासार साहेबप्रशासन अधिकारी श्री. पटेल साहेबकेंद्रप्रमुख श्री. पाटील सरपर्यवेक्षक श्री. राजेंद्र घोडके सर, माजी मुख्याध्यापक श्री. नारायण पाटील सर, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. राजाराम लोंढे सर, तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे आयुक्त मॅडम यांच्या जीपचे सारथ्य माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते पैलवान श्री. अमृत मामा भोसले यांनी केले. संपूर्ण परिसरातून मिरवणूक काढली गेली, जी परिसरातील आकर्षणाचे केंद्र ठरली.

मिरवणुकीनंतर शाळेत आगतस्वागत फुलांच्या वर्षावात करण्यात आले. यानंतर विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. आयुक्त पल्लवी पाटील मॅडम व शिक्षणाधिकारी साहेबांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Advt

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आनंद शिंदे सर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. कल्पना कुंभार मॅडम तर आभार प्रदर्शन सौ. सुवर्णा पाटील मॅडम यांनी केले.

या यशस्वी कार्यक्रमासाठी शाळेचे आधारस्तंभ श्री. अमृत मामा भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले. यासोबतच प्रभारी मुख्याध्यापक लोंढे सर व सर्व अध्यापकवृंद यांचेही मोलाचे योगदान होते.

या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पत्रकार व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात सहभाग नोंदवला. सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक केले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा