इचलकरंजी मनपा स्तर शालेय शासकीय क्रीडा स्पर्धा नियोजन बैठक संपन्न
इचलकरंजी :
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील इचलकरंजी म. न. पा. स्तर शालेय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांची नियोजन सभा इचलकरंजी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पार पडली.
इचलकरंजी महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित नियोजन सभेत जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. विद्या शिरस यांनी मार्गदर्शन केले.
पंच व खेळ अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहील. जन्मतारखेत फेरफार करून अधिक वयाचे खेळाडू खेळविल्यास तसेच स्पर्धा संयोजनात अडथळा निर्माण करणे, खोटी माहिती देणे, या बाबी निदर्शनास आल्यास गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा देत तसेच या वर्षापासून सर्टिफिकेट ऑनलाइन मिळणार आहेत .नियम व अटींचे काटेकोर पालन करून खेळाडूवृत्ती जपत शासकीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले. त्यांनी स्पर्धेसाठीच्या नियमांची माहिती दिली. स्पर्धा प्रवेशिका मुदतीत भरावी, लॉट्स दिलेल्या वेळेत शाळेच्या शिक्षकांच्या उपस्थितीतच पडतील. नियोजित वेळेपूर्वी क्रीडाशिक्षक व खेळाडूंनी रिपोर्टिंग करावे. खेळाडूंच्या वयाचा दाखला, शाळा रजिस्टर, साक्षांकित प्रत, ऑनलाईन प्रवेशिका, ओळखपत्र, जन्म दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट अधिक कागदपत्रे बंधनकारक आहेत. प्रवेशिकावर ज्या क्रीडाशिक्षकांचे नाव आहे त्यांची उपस्थिती अनिवार्य असेल.
Advt
14 वर्षाखालील खेळाडूंना शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक व राज्यातील खेळाडूंच्या कागदपत्रांची कठोर तपासणी. उत्तेजक द्रव्यांच्या वापरावर बंदी, स्पर्धेच्या ठिकाणी स्वच्छता, शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. राष्ट्रीय स्पर्धेकरिता खेळाडूंची वय पडताळणी चाचणी शाळांना अनिर्वाय आहे.
पंच व संबंधित खेळ अधिकारी यांचा निर्णय अंतिम राहील. संघटनात्मक व वैयक्तिक वाद करू नयेत. कोणत्याही कारणास्तव खेळाडूस दुखापत झाल्यास संयोजन समिती जबाबदार राहणार नाही. प्रथमोपचार देण्यात येतील आदी गोष्टींचा समावेश होता. विचार सभेत क्रीडाशिक्षक यांनी ऑनलाइन प्रवेशिका, प्रमाणपत्र, संलग्नता फी इ. विषयावर प्रश्न विचारले. सभेला इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त नंदू परळकर, राहुल मर्ढेकर, सहा. आयुक्त श्रीमती रोशनी गोडे, विजय राजापुरे, तालुका क्रीडा अधिकारी एल. जी. पवार, क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, रवी भूषण कुमठेकर, अनिकेत बोडके, शेखर शहा, शंकर पोवार, राहुल कुलकर्णी, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे, क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे, आकाश माने सर्व क्रीडाशिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. राहुल कुलकर्णी यांनी केले तर शेवटी आभार सचिन खोंद्रे यांनी मानले.
बैठकीत जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस व इमनपा अधिकारी तसेच क्रीडा प्रशिक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







