दि इचलकरंजी पॉवरलूम अॅण्ड यार्न मर्चंट (अडत) असोसिएशनचे अध्यक्षपदी ओमप्रकाशजी छाजेड यांची निवड; पॉवरलूम असोसिएशन तर्फे सत्कार सोहळा संपन्न
इचलकरंजी :
दि इचलकरंजी पॉवरलूम क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंट (अडत) असोसिएशनच्या अध्यक्षपदी ओमप्रकाशजी छाजेड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील यांनी अडत व्यापारी, कारखानदार व दलाल यांच्या समन्वयातून कापड व्यापार सुरू असून, तो आणखी पारदर्शक व सुस्थित होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
ADvt
कार्यक्रमात उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, दलाल असोसिएशनचे बाळासो ओझा व कारखानदार बाळकृष्ण पोवळे यांनी आपली मनोगते मांडली. कारखानदार थेट इतर शहरांत विक्री करीत असल्याने दलाल व अडत्यांची संख्या घटत असल्याबाबत चिंता व्यक्त झाली.
व्यापारातील अनिष्ट प्रथा, ट्रान्सपोर्ट असोसिएशन व माथाडी कामगारांशी संबंधित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली. व्यापार वृद्धिंगत करून इचलकरंजीचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास पॉवरलूम असोसिएशनचे संचालक सोमाण्णा वाळकुंजे, पांडुरंग सोलगे, सुभाष बलवान, दत्तात्रय टेके, राजाराम गिरी, अडत असोसिएशनचे ओमप्रकाश वेदमुथा, चंद्रकांत सुतार, प्रकाश वेद मेहता, ईश्वर शेखावत, मनोहर ओझा, शामलालजी पारीख, पियुष सालेचा, मिलिंद बिडकर यांच्यासह कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओमप्रकाशजी छाजेड यांचा सत्कार करताना चंद्रकांत पाटील व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







