ICHMH51NEWS.IN
9921600800

बाळनाथ महाराज मठात आज भेदिक व कलगीतुरा कार्यक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बाळनाथ महाराज मठात आज भेदिक व कलगीतुरा कार्यक्रम

इचलकरंजी :

येथील परमपूज्य सद्गुरु बाळनाथ महाराज मठात नागपंचमी निमित्त मंगळवार, २९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता संगीतमय भेदिक आणि कलगीतुरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी बाळनाथ महाराज लिखित पोवाडा व शायरी स्वरूपात भेदिक सादर करण्याची परंपरा त्यांच्या समाधीनंतरही अखंड सुरू आहे. या कार्यक्रमात कवलापूर व बहादूरवाडी येथील नामवंत कलाकार सहभागी होणार असून, विविध सांस्कृतिक सादरीकरणे होणार आहेत. भक्तिभाव, संगीत आणि पारंपरिक कलांचा संगम घडवणारा हा कार्यक्रम भक्तांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. मठ प्रशासनाने सर्व भक्तजनांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.सदरचा कार्यक्रम झेंडा चौक ते  महादेव मंदिर रस्त्यावर असणाऱ्या बाळनाथ महाराज मठात होईल.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा