ICHMH51NEWS.IN
9921600800

संजय गांधी योजना लाभार्थ्यांना ८ महिन्यांपासून अनुदान नाही; माजी मंत्री प्रकाश आवाडेंचा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संजय गांधी योजना लाभार्थ्यांना ८ महिन्यांपासून अनुदान नाही; माजी मंत्री प्रकाश आवाडेंचा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा

इचलकरंजी –

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सुमारे ५ हजार लाभार्थ्यांना डीबीटी (DBT) पोर्टलमधील तांत्रिक अडचणीमुळे मागील 8 महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. यासंदर्भात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. लाभार्थ्यांचे थकीत अनुदान तातडीने खात्यावर जमा व्हावे, अशा विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

ADvt

जिल्हाधिकारी येडगे यांनी डीबीटी पोर्टलमधील अडचणी शासन दरबारी मांडून लवकरच मार्ग काढू, अशी ग्वाही दिली. तसेच स्वस्त धान्य दुकानातील अर्जांच्या प्रचंड संख्येचा विचार करता इचलकरंजी पुरवठा कार्यालयात दुसऱ्या लॉगइनची सोय तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले. एकाच लॉगइनवर सध्या काम सुरू असल्याने अंमलबजावणीत विलंब होतो, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी विधवा, तसेच वृद्धापकाळ योजनांचे अनुदान डिसेंबर २०२४ पासून डीबीटीद्वारे जमा होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, काही त्रुटींमुळे नोंदणीसाठी लागणारी OTP लिंक बंद झाली असून, त्यामुळे पात्र लाभार्थीही नोंदणी करू शकत नाहीत. काहींना फक्त एका महिन्याचेच अनुदान जमा झाले असून उर्वरित थकीत रक्कम मिळालेली नाही.

तसेच, जीवन प्रमाणपत्र अपडेट करताना “नॉट रजिस्टर्ड” असा संदेश येत असून, हे लाभार्थी पूर्वीपासून रजिस्टर्ड आहेत, याचीही दखल घेण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी येडगे यांनी सर्व तांत्रिक अडचणींबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

या शिष्टमंडळात प्रकाश दत्तवाडे, श्रीरंग खवरे, शशिकांत मोहिते, संजय केंगार, अनिल डाळ्या, शेखर शहा, रवी जावळे, राहुल घाट, कोंडीबा दवडते, सुखदेव माळकरी, रमेश पाटील, नजमा शेख, मंगल सुर्वे, सपना भिसे, अर्चना कुडचे, सीमा कमते यांचा समावेश होता.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा