सामुहिक प्रोत्साहन योजनेतील त्रुटी दूर करण्यास राहुल आवाडेंना यश
इचलकरंजी
यानंतर सामुहिक प्रोत्साहन योजना २०१३ व २०१९ योजनेची माहिती घेतल्यानंतर असे लक्षात आले की, सदरची योजना बंद असल्याकारणाने उद्योजकांनी अर्ज दाखल केलेले नाहीत अथवा दाखल करून घेतलेले नाहीत. यानंतर पुन्हा एकदा आमदार राहुल आवाडे यांनी याप्रश्नी प्रयत्न व पाठपुरावा करून दि. ३० जुलै २०२५ रोजी एक परिपत्रक निर्गमीत करून घेतलेले आहे. या परिपत्रकाप्रमाणे ज्या उद्योजकांचा दि. १५ मे २०१५ पुर्वीचा ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना आहे अशा उद्योजकांना आता दि. ३१ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत मिळालेली आहे. यामुळे ग्रामिण भागात उद्योग उभा केलेल्या अंदाजे ४०० उद्योजकांना याचा फायदा होणार आहे. तरी अशा उद्योजकांनी लवकरात लवकर उद्योग संचालनालय / संबंधित विभागीय कार्यालय / जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत अशी माहिती दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







