ICHMH51NEWS.IN
9921600800

रफी की यादमे मैफल संपन्न.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रफी की यादमे मैफल संपन्न

इचलकरंजी :

  ख्यातनाम सिने पार्श्वगायक कालवश महंमद रफी यांच्या ४५ व्या स्मृतिदिनानिमित्त समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन वाचनालय आणि रंगयात्रा नाट्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ” रफी की याद में  ” ही  सदाबहार  गीतांची बहारदार मैफल संपन्न झाली.

स्वागत अरुण दळवी यांनी केले.प्रास्ताविक प्रा. मिलिंद दांडेकर यांनी केले. प्रसाद कुलकर्णी यांनी महंमद रफिऺच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अहमद मुजावर, जयकुमार कोले,बजरंग लोणारी, रामदास कोळी , वैशालीताई नाईकवाडे आदी प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. अहमद मुजावर यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले.

Advt

तीन तासाहून अधिक काळ रंगलेल्या या मैफलीचे अतिशय बहारदार सूत्रसंचलन अरुण दळवी, प्रा. मिलिंद दांडेकर आणि ॲड.माधुरी काजवे यांनी केले. त्यांनी सूत्रसंचालनात महंमद रफी यांचे किस्से संगीतकार, चित्रपट ,कलाकार आदींची माहिती देऊन या मैफलीत रंग भरले.या मैफलीत अवधूत गाडदी ( हा तुम मुझे यू भूला ना), संजय जाधव ( मैने पुछा चांदसे),विजय बागडे (छू लेने दो नाजूक होटोसे), भाऊसाहेब केटकाळे ( बंधन पे सितारे) , श्रीकांत काजवे ( सुबह ना आई) , कांचनभाट ( क्या हुआ तेरा वादा), भूषण भिवरे ( विको है निगाहमे) , संजय चिऺचवाडे ( शोधीसी मानवा ), यादव सर (तेरी प्यारी प्यारी सूरत ) अजिंक्य वाळवेकर आणि केतकी पाटील ( तेरी बिंदिया रे) ,अजित मिणेकर ( ये दुनिया में महफिल) , सुनिता कळऺत्रे( लुक जा रात ), शरद मगदूम ( चाहें कोई मुझे जंगली) , फिरोज खैरदी आणि अरुण दळवी ( जानू मेरी जान ), निलेश लोखंडे (आज मौसम बडा) , प्रि. विरुपाक्ष खानाज ( वादीया मेरा दामन) , प्रताप जाधव ( लिखे जो खत ),  केतकी पाटील ( एहसान तेरा होगा ), डी.डी. कुलकर्णी ( तेरी आखोके सिवा ) , बाबासाहेब निकम ( तुझको पुकारे मेरा प्यार ), सूरज रवऺदे ( तुम जो मिल गये), अलका खराडे ( तुझको पुकारले मेरा प्यार ) , जगन्नाथ पोटे ( चाहूगा मैं तुझे) , रामचंद्र ढेरे ( यूही तुम मुझसे) , प्रमोद सिंहासने ( क्या हुआ तेरा ) , सुरेश चौगुले ( रंग और नूरकी) , दिलीप कुलकर्णी ( ये मेरा प्रेम पत्र पढकर ) , अहमदभाई मुजावर ( तेरे नाम कि दिवाना),अरुण दळवी ( आ मेरी रानी ले जा ), प्रा.मिलिद दांडेकर ( छलकाये जाम ) आणि शेवट अर्जुन रंगरेज (अभी ना जाओ छोडकर) या मैफलीला रसिक श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा