ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहरातील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर टेम्पोनंतर आता ट्रकचालकांकडून नियमभंग, नागरिक त्रस्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहरातील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
टेम्पोनंतर आता ट्रकचालकांकडून नियमभंग, नागरिक त्रस्त

व्हिडीओ-https://youtube.com/shorts/dYD6WeZYJxU?si=vN1sv4UXllQM0v_V

 

 

 

इचलकरंजी

इचलकरंजी शहरात टेम्पोंच्या नंतर आता ट्रकचालकांकडूनही धोकादायक वाहतुकीचे प्रकार समोर येत आहेत. शहर वाहतूक आराखड्यातील स्पष्ट नियम असूनही मध्यवर्ती भागात ट्रक आणि टेम्पो यांची वर्दळ सुरूच आहे. यामुळे नागरिकांना दररोज अपघाताचा धोका पत्करावा लागत असून, वाहनचालक बेधडकपणे वाहतुकीचे नियम झुगारत आहेत.

शहरातील मध्यवर्ती भागात वाहतुकीसाठी बंदी असतानाही मोठ्या वाहनांची सर्रास ये-जा सुरू आहे. पोलिस आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत.

वाहतूक शाखेने गंभीरतेने लक्ष घालून ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा