नारळीपौर्णिमा व रक्षाबंधनला इचलकरंजी आगारच्या जादा एस.टी. फेऱ्या
इचलकरंजी:
नारळीपौर्णिमा (८ ऑगस्ट) आणि रक्षाबंधन (९ ऑगस्ट) सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी इचलकरंजी आगारमार्फत जादा एस.टी. फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर, सांगली, मिरज, नृसिंहवाडी, पेठवडगाव, निपाणी, पुणे आणि सोलापूर या प्रमुख मार्गांवर अतिरिक्त बसेस धावणार आहेत. प्रवासी बंधु-भगिनींनी या विशेष सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक, राज्य परिवहन इचलकरंजी आगार यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







