ICHMH51NEWS.IN
9921600800

क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थीनीनी काढल्या २०० देशभक्तीपर रांगोळ्या

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थीनीनी काढल्या २०० देशभक्तीपर रांगोळ्या

इचलकरंजी

’हरघर तिरंगा’ या शासकीय राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत, रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या सुमारे २०० विद्यार्थी विद्यार्थिनींनी क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला तीन बत्ती चार रस्ता या ठिकाणी देशभक्तांच्या व देशभक्ती जागवणाऱ्या सुंदर रांगोळ्या काढल्या.


यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी 50 स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमा हातात घेऊन, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीने भारून टाकला.या उपक्रमाने उपस्थित नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अलका शेलार, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके, महिला व बालकल्याण विभागाच्या प्रमुख बेबी नदाफ, आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख संजय कांबळे, तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी विशेष कौतुक केले आणि सहभागी विद्यार्थिनींना बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढवला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा