मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद ३,५८,५००/- रुपये किमतीचे वेगवेगळ्या कपंनीचे एकुण ४६ मोबाईल हँडसेट जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई. व्हिडीओ- https://youtube.com/shorts/Dbl8a0ILCuQ?si=D57EmvjRbYBDiPas
कोल्हापूर
जिल्ह्यातील मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, श्री. योगेश गुप्ता साो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुन्ह्यांचा समांतर तपास करणे बाबत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करुन घडलेले गुन्हे उघडकीस आणणेकरीता योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
मा. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील वेगवेगळी पथके तयार केली. त्यामधील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे पथकातील पोलीस अमंलदार संदीप पाटील व शिवानंद मठपती यांना त्याचे गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की, तीन इसमांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशन व मध्यवर्ती बस स्थानक येथुन मोठ्या प्रमाणात मोबाईल हँडसेंट चोरी केलेले आहेत व ते इसम शाहुपुरी भाजी मंडई या परिसरात फिरत आहेत अशी माहिती मिळालेने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्याचे पथकास कारवाई करणेबाबत सुचना दिल्या त्यानुसार पथकाने आज दिनांक ०८.०८.२०२५ रोजी सकाळी ०७.०० वा चे सुमारास शाहुपुरी भाजी मंडई परिसरामध्ये पेट्रोलिंग करुन मिळाले बातमी प्रमाणे तीन सशंयीत इसमांना ताब्यात घेतले त्यांना त्याची नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १। गणेश अनिल माने वय २३ रा नागोबावाडी पेठवडगाव ता हातकंणगले जि. कोल्हापूर, २] महादेव राजाराम पाटील वय ३४ रा. साजणी ता. हातकंगणले जि कोल्हापूर व ३] गणेश शिवाजी माने वय. २७ रा.मुळ कोळा पुजारी वस्ती गौडवाडी रोड सोलापुर अशी असलेची सांगीतले, त्यांनतर दोन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे ३,५८,५००/- रुपये किमतीचे तब्बल वेगेवगळ्या कंपनीचे ४६ मोबाईल हँडसेट मिळुन आले ते मोबाईल हँडसेट कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करुन घेतले.
सदर आरोपीं नामे १] गणेश अनिल माने वय २३ रा नागोबावाडी पेठवडगाव ता हातकंणगले जि. कोल्हापूर, २] महादेव राजाराम पाटील वय ३४ रा. साजणी ता. हातकंगणले जि कोल्हापूर व ३] गणेश शिवाजी माने वय. २७ रा. मुळ कोळा पुजारी वस्ती गौडवाडी रोड सोलापुर यांना ताब्यात घेवुन शाहुपुरी पोलीस ठाणेस येथे हजर केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास शाहुपुरी पोलीस ठाणेच पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार सो, व मा.अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार व श्री आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सागर वाघ सपोनि, शेष मोरे पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदार संदीप पाटील, वसंत पिंगळे, शिवानंद मठपती, सचिन जाधव, अनिकेत मोरे, अमित सर्जे, संजय पडवळ, विलास किरोळकर, संजय हुंबे, सतिश सुर्यवंशी, अरविंद पाटील यांनी केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







