ICHMH51NEWS.IN
9921600800

खालिद का शिवाजी चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालावी :- बजरंग दल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खालिद का शिवाजी चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालावी :- बजरंग दल

इचलकरंजी
 ‘ खालिद का शिवाजी ‘ या चित्रपटाविरोधात जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनास मनाई करण्यात यावी असे निवेदन प्रांताधिकारीना विहिप बजरंग दल तर्फे देण्यात आले..
सदर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक खोटे आणि अनैतिहासिक दावे करण्यात आले आहेत.
 महाराजांच्या सैन्यात ३५% मुसलमान होते, त्यांच्या अंगरक्षकांपैकी ११ मुसलमान होते, त्यांनी रायगड किल्ल्यावर मशिद बांधली,तसेच चित्रपटाच्या शीर्षकात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे.
यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो.
या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यात सदर ‘ *खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासंबंधी जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृह चालकांना योग्य सूचना द्याव्यात.या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, प्रसारमाध्यमे तसेच हा चित्रपट परदेशी पाठवून शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्यात सामील असलेल्या सर्व ज्युरी , अधिकारी, मंत्री तसेच अन्य संबंधितांवर  अफवा पसरवणे, अपप्रचार करणे, धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक स्थळांबाबत अपप्रचार करणे या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत
यावेळी  विहिप बजरंग दल चे पदाधिकारी व हिंदुनिष्ठ उपस्थित होते..
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा