भाजपच्या वतीने क्रांतीवीराना अभिवादन.
इचलकरंजी:
९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात आले. येथील पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृती स्तंभास आमदार राहुल आवाडे आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
९ ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो, ज्याने अखेरीस ब्रिटिशांना भारतातून जाण्यास भाग पाडले. देश स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतीवीरांना अभिवादन केले जाते. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुरवठा कार्यालयातील स्मृती स्तंभास अभिवादन करण्यात आले. यावेळी इचलकरंजी शहर पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, महावीर कुरुंदवाडे, चंद्रकांत इंगवले, अनिल कुडचे, राजू बोंद्रे, शेखर शहा, नरसिंह पारीक, एम. के. कांबळे, प्रमोद बचाटे, सुखदेव माळकरी, चंद्रकांत कोष्टी, वसंत येटाळे, मारुती पाथरवट, किशो पवार, राजू दरीबे, बजरंग कुंभार, सर्जेराव हळदकर, सचिन माळी, बापू घुले, प्रमोद काडाप्पा, नजमा शेख, मंगल सुर्वे, सुवर्णा लाड, सीमा कमते, सपना भिसे, तुळसाबाई काटकर, जयश्री शेलार, माधवी देसाई व विद्या लवटे आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रांतीवीराणा अभिवादन करताना आ.राहुल आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








