देवीच्या मिरवणुकीतील जुन्या वादातून प्लॉट एजंटला मारहाण
इचलकरंजी:
इचलकरंजी शहरातील कापड मार्केट परिसरात देवीच्या मिरवणुकीदरम्यान जुन्या झालेल्या वादाचा राग मनात धरून एका प्लॉट एजंटला मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी घडलेल्या याप्रकरणी संजय बाळासो पाटील (वय ५६, व्यवसाय प्लॉट एजंट, रा. विक्रमनगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार आरोपी विशाल अरुण पोवार, विनायक अरुण पोवार, आकाश कुमार चोरगे, विनायक सुभाष कुंभार, अनिकेत जयवंत चौगुले, शुभम शिवाजी जाधव व ओंकार श्रीकांत शिंदे यांनी जमाव जमवून फिर्यादीस शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







