ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीमती आ रा पाटील कन्या महाविद्यालय श्रम संस्कार शिबीराचा समारोप उत्साहात संपन्न.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमती आ रा पाटील कन्या महाविद्यालय श्रम संस्कार शिबीराचा समारोप उत्साहात संपन्न.

इचलकरंजी:

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित
श्रीमती आ रा  पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात  दिवसाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर शिवनाकवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिबिराच्या समारोप समारंभातचे प्रमुख पाहुणे म्हणून डी के ए एस सी महाविद्यालय इचलकरंजी च्या समाजशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा एम एम कांबळे हे उपस्थित होते.त्यांनी स्वयंसेविकांना मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले कि,राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामधून स्वयंसेविकांचा सर्वांगीण विकास होतो तसेच भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यास शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या त्या खंबीर होतात.त्यामुळे महाविद्यालयीन स्तरावर अशा उपक्रमात विद्यार्थीनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र प्राचार्य प्रो डॉ त्रिशला कदम यांनी आपल्या मनोगतात एन एस एस युनिटचे कौतुक करताना प्रथमच दत्तक खेडे म्हणून शिवनाकवाडी गावाची निवड करून  सात दिवसात केलेल्या विविध उपक्रम, प्रबोधनाचे कार्यक्रम यांचा आढावा घेताना ग्रामस्थांच्या सहकार्याबददल आभार मानले.

कार्यक्रमाच्या आरंभी महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रस्तावना, पाहुण्यांची ओळख आणि अहवाल वाचन एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ धीरज शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा स्वाती हाळवणकर यांनी मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा अंकुश कुरणे यांनी केले.यावेळी विद्यामंदीर शिवनाक वाडीचे मुख्याध्यापक श्री तुकाराम राजुगडे,योगेश उमराणे,रणजित पाटील,प्रा प्रिया सुतार,श्री तानाजी भारती,श्री प्रदीप खोत ग्रामस्थ,स्वयंसेविका उपस्थित होते.

श्रम संस्कार शिबिर समारोपप्रसंगी प्रा त्रिशला कदम व मान्यवर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा